“जळगावचा राजा” चे उत्साहात आगमन

ऑगस्ट 27, 2022 8:30 PM

The King of Jalgaon jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । येथील श्री नेहरू चौक मित्र मंडळ चौकातील “जळगावचा राजा श्री गणेशा”चे जळगाव शहरात मुंबईतून आगमन झाले आहे. शुक्रवार दि.२६ ऑगस्ट रोजी ‘जळगावचा राजा’ जळगाव शहरात आले.

‘जळगावच्या राजा’ची मूर्ती मुंबई येथील मूर्तिकार उदय खातू यांनी साकारली असून उंची साडेसात फूट आहे. यंदा गणेश मूर्तीची संकल्पना डॉ. हेमचंद्र काळुंखे यांचे असून सजावट संदीप रडे यांनी केली आहे. मुंबईतून जळगावला आणताना कार्यकर्ते सचिन येवले, सागर चौधरी उपस्थित होते. वाहनांची व्यवस्था पियुष गांधी यांनी केली.

जळगावात शुक्रवारी ‘जळगावचा राजा’ची मूर्ती भवानी पेठेत उतरली, त्यावेळेला अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावर्षी श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे श्री काशी विश्वेश्वर मंदिराची वाराणसी येथील प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना या मंदिराचे दर्शन जळगावातच होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now