जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । चाळीसगाव शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात रयत सेनेच्या बैठक दि.२४ रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडली. रयत महिला आघाडीच्या शहरउपाध्यक्ष पदी विमलाबाई मेटकर, रत्ना पाटील, सचिवपदी आशा पाटील यांची निवड करून नियूक्तीपत्र रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच योगिता चंद्रकांत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
रयत सेनेचे जनसामान्य जनतेप्रती असलेले कार्य व वंचित घटकांना न्याय देण्याचा संघर्ष बघून रयत सेनेत सर्व स्तरावरील तरुण,महिलांचा ओघ सुरू झाल्याने रयत सेनेच्या कार्याची दखल जनमानसात घेतली जात असल्याचे प्रा रवि चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार,प्रदेश संघटक संतोष निकुंभ ( संता पैलवान), प्रदेश समन्वय पि एन पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड उपाध्यक्ष गोकुळ पाटील,जिल्हाध्यक्ष संजय कापसे , विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, अनिल कोल्हे,विनायक मांडोळे,मनोज पाटील, शहराध्यक्ष छोटू अहिरे,तालुका उपाध्यक्ष विकास बोंडारे , उद्देश शिंदे ,विकी पावले, छोटू अहिरे , प्रशांत आसबे, चंदन राणा , मंगेश पवार ,विक्की गायकवाड ,जयेश शिंदे अदी उपस्थित होते.