जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जनतेची सरकारी कामे करण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी असतात.त्यांना त्या त्या कामाचे ट्रैनिंग दिले जाते.तरीही ते कामचुकारपणा करतात.कारण समोरचा आगंतुक नागरिक अशिक्षित, अल्पशिक्षित किंवा अकुशल असतो.त्यामुळे आत बसलेला नोकर बाहेरील माणसाला जुमानत नाही.समोरचा आगंतुक अडला नारायण असतो.त्यामुळे आत बसलेला नोकर त्याची अडवणूक करतो.जेणेकरून काहीतरी खुशाली देईलच.समोर आलेल्या आगंतुक च्या मजबुरीचा गैरफायदा आत खुर्चीवर बसलेला नोकर घेतो.या नोकरांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीचे पदाधिकारी मंडळ असते.गावस्तरावर ग्रामपंचायत सदस्य,तालुका स्तरावर पंचायत समिती सदस्य, जिल्हा स्तरावर झेडपी सदस्य.राज्य स्तरावर आमदार,देश स्तरावर खासदार.यातील काही सदस्य कार्यकारी मंडळ बनवतात.त्याला आपण मंत्रीमंडळ म्हणतो.हे मंत्री त्या त्या डिपार्टमेंट चे खातेप्रमुख असतात.ते मंत्री प्रशासन राबवतात,वचक ठेवतात,ऐन वेळी परस्पर निर्णय सुद्धा घेतात.
प्रशासकीय नोकरांच्या भरती, प्रमोशन मधे मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत.ती तशी स्वतंत्र नियमावली असते.पण कर्मचारी व अधिकारी ची बदली मात्र अप्रत्यक्षपणे करू शकतात.हायकोर्टाच्या स्तरापेक्षा खालचे निर्णय,शिक्षा ते फिरवू शकतात.तसे ज्युडिशियल आधिकार राज्यमंत्री ला असतात.बदली आणि शिक्षा यात हस्तक्षेप असल्याने मंत्रीचा दरारा बनतो.या दराराच्या दहशतीने तो अधिकाऱ्यांना हवे तसे नाचवतो.एमपीएससी, युपीएससी आधिकारी येथेच नरमतात.अडाणचोट व आडदांड मंत्रीला खुर्चीवरून उठून येस सर,नो सर,जी सर म्हणतात.येथे कलेक्टर,एसपी सुद्धा आपले पावित्र्य गमावून बसतात. न्यायाधीश अजून तरी मंत्रीला येस सर,नो सर,जी सर म्हणत नाहीत.तितकेच आशास्थान उरललेले आहे. क्वचित अधिकारी, मनु श्रीवास्तव,प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे मंत्रीला झुगारण्याचे धाडस करतात.मंत्रीने पैशाचे पोते कुरडण्याचा प्रयत्न केला तर हातावर,तोंडावर दंडुक मारतात.
बदलीला घाबरलेले अधिकारी मंत्रीपुढे वाकून असतात.यात कलेक्टर चा मुख्य रोल असतो.कोणताही मंत्री सरळ तिजोरीतून काढून पैसा लुटू शकत नाही.विकासनिधी जिल्हा विकास नियोजन समीती कडे वर्ग होतो.तेथे पालकमंत्री अध्यक्ष असतो.कलेक्टर सचिव असतो.जिल्हातील आमदारांचे प्रस्ताव पालकमंत्री मंजूर करतात.म्हणून आमदार सुद्धा ” मामा ” बनून असतात.आमदार व मंत्री यांचे विकास योजनेचे प्रस्ताव जिल्हा विकास नियोजन समीतीमधे मंजूर होऊन पुढील कारवाई बाबत ,इस्टीमेट,टेंडर,वर्क ऑर्डर संबंधित खात्याकडे पाठवले जातात.वर्क ऑर्डर नुसार झालेल्या कामाचे पेमेंट कलेक्टर च्या सहीने संबंधित विभागप्रमुख मार्फत वितरीत होते.जर कलेक्टर किंवा विभागप्रमुख प्रामाणिक असेल, मंत्रीला न दचकणारा असेल तर कामाचे मुल्यमापन केल्याशिवाय बील पेमेंट अदा करणार नाहीत.पण मंत्रीच्या दरारामुळे दबकून बिनाकामाचे बील पेमेंट वितरीत केले जाते.येथेच मोठी चूक होते.येथेच निधीची चोरी होती.कामापेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त बील पेमेंट वितरीत केले तरच आमदार व मंत्री ला मक्तेदार कमीशन देतो.काही मक्तेदार तर काम न करताच एमबी वगैरे भरून मंत्रीला देतो.त्याचे पुर्ण पेमेंट तो मंत्री कलेक्टर कडून, विभागप्रमुख कडून काढून घेतो.येथेच चोरी होते. येथेच लॉक असणे आवश्यक असते.आधिकारीवर मंत्रीचा वचक आणि मंत्रीवर आधिकाऱ्याचा वचक.हे दोन्ही,मंत्री आणि अधिकारी संगनमताने निधीची चोरी करतात.तिसरा कोणी हस्तक्षेप करू शकत नाही.वचक ठेवू शकत नाही.येथेच भ्रष्टाचाराची गंगोत्री,जम्नोत्री आहे.येथेच भ्रष्टाचाराचा उगम होतो.
आमदार , खासदार ही असाच घपला मारत असतात.म्हणून ते ही चूप बसतात.जर कोणी प्रामाणिक आमदाराने किंवा खासदाराने अशा बोगस बीलपेमेंट वर आक्षेप घेतला तर मंत्री भ्रष्टाचार करू शकणार नाही.पण असा आमदार किंवा खासदार आम्ही जळगाव जिल्ह्यातील लोकांनी निवडून दिला नाही.जर असेल कोणी एखादा तर मंत्री चोरी करू शकणार नाही.
अशी निधीची गटारगंगा वाहात असतांना काठावरील कोणी दुखी आत्मा याबाबत कोणा आरटीआय किंवा कोणा समाजसेवकाला खबरबात देतो.तेंव्हा या चोरीबाबत माहिती मिळवून गाजावाजा केला जातो.किंवा पोलिसात,कोर्टात तक्रार केली जाते. जळगाव जिल्ह्यातील एकाही आमदाराने असा भ्रष्टाचार उघड केला नाही.मग तो कांग्रेस चा असो कि भाजपचा .शिवसेनेचा असो कि राष्ट्रवादी चा.हे सुद्धा नालायक आमदार आहेत.चोर आमदार आहेत.म्हणून चूप बसतात.खडसेनी फक्त सीडी दाखवण्याऐवजी असा अपहार उघडकीस आणला पाहिजे.शिरीष चौधरी,अनिल पाटील यांनी कोरोना काळातील अपहार उघड केला पाहिजे.चिमणराव पाटील यांनी हा विषय अर्धवट न सोडता तडीस नेला पाहिजे.पालकमंत्रीने केलेल्या अपहारास त्या जिल्ह्यातील आमदार खासदार सुद्धा तितकेच जबाबदार असतात.नव्हे, हे सहमत असतात.मंत्रीच्या पंक्तीत ते सुद्धा जेवणाला बसलेले असतात.
किरीट सोमय्या हे असा भ्रष्टाचार उघडकीस आणून इडी पर्यंत पोहचवतात.ते आजघडीला खासदार किंवा आमदार नसले तरीसुद्धा.त्यांना दुषणे देण्याऐवजी तुम्ही का नाही करीत हे काम? कारण तुम्ही सुद्धा चोर आहात. जळगांव जिल्ह्यातील भ्रष्टाचार किरीट सोमय्या यांचे पर्यंत जाईपर्यंत आमचा चोर मंत्री करांच्या,सहेलींच्या,व्याहींच्या,जावईच्या नावाने बंगले, जमीन,कारखाने खरेदी करून नामनिराळे होतात.जळगांव जिल्ह्यातील एक जरी आमदार किंवा खासदार प्रामाणिक असता तर कोरोना काळात निधीचा अपहार झालाच नसता.असा एकतरी आमदार किंवा खासदार निवडून देणे लोकांची जबाबदारी आहे,गरज आहे, आवश्यक आहे.
भ्रष्टाचारविरोधात अनेक लोक बोलतात.पण प्रत्यक्षात विरोधात उभे राहात नाहीत.कोणी भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी विरोधात आंदोलन केले तर सोबत येत नाहीत.शिळोप्याच्या गप्पा मारून भ्रष्टाचार थांबणार नाही.त्यासाठी पाहिजे जातीचे.मातीचे पाय नको.

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.








