⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | शेतकर्‍यांना ‘लंपी’ आजाराची नुकसान भरपाई द्या : शिवसेना

शेतकर्‍यांना ‘लंपी’ आजाराची नुकसान भरपाई द्या : शिवसेना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२२ । गुरांवर आलेल्या संसर्गजन्य आजार लंपी स्किन डिसीजमुळे गुरांवर मोफत लसीकरण करावे, शेतकर्‍यांना त्यांच्या मृत पावलेल्या जनावरांच्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी यावल तहसील प्रशासनाल शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आली.

गत काही दिवसांपासून गुरांवर संसर्गजन्य आजार लंपी स्किन डिसीज आल्याने मोठ्या प्रमाणावर तालुक्यात गुरे दगावली आहेत. या गुरा-ढोरांवर उपचार करण्यासाठी शेतकर्‍यांना आपल्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहे. हा संसर्गजन्य रोग असल्याने झपाट्याने गुरांमध्ये तो पसरत आहे त्यामुळे शेतकर्‍यांचे अनेक गुरे दगावून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जे गुरे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी शेतकरी शर्तीने प्रयत्न करीत आहे मात्र महागडे औषध घेणे त्याला परवडत नाही. शासनाने यासाठी मोफत औषधीची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे ज्या शेतकर्‍यांचे गुरे-ढोरे दगावून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, डॉ.विवेक अडकमोल, संतोष खर्चे, पप्पू जोशी, पिंटू कुंभार, सारंग बेहेडे, मयूर खर्चे, हेमंत पाटील, चिंधू कोळी, सागर देवांग, सुरेश कुंभार, विजू कुंभारसह मोठ्या संख्येत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह