⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर..! सणासुदीत खाद्यतेल आणखी स्वस्त होणार?

खुशखबर..! सणासुदीत खाद्यतेल आणखी स्वस्त होणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । महागाईने हैराण झालेल्या जनतेला दिलासा देणारी बातमी आहे. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. कारण जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. मात्र भारतातील ग्राहकांना अद्याप इतका फायदा झालेला नाही. पाम तेलात मोठी घसरण झाली असून, येत्या काही दिवसात खाद्यतेलाच्या किमती घसरून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे, पण त्या तुलनेत ग्राहकांना त्या घसरणीचा लाभ मिळू शकलेला नाही. किरकोळ बाजारात कमाल किरकोळ किंमत (MRP) गरजेपेक्षा जास्त ठेवण्यात आली आहे. किरकोळ विक्रेते एमआरपीच्या बहाण्याने ग्राहकांकडून जादा दर आकारत आहेत. परदेशात जेवढी किंमत कमी झाली आहे, तीच किंमत भारतात कमी केली तर तेलाच्या किमतीत अजूनही मोठी घसरण होऊ शकते.

भारतीय शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो
बाजारात पामतेलाचे भावात मोठी घसरण झाली आहे. पामतेल असेच स्वस्त राहिल्यास सोयाबीन, भुईमूग आणि कापूस बियाणे पिकांवर अडचणी येऊ शकतात, असे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण बाजारात पामतेल स्वस्त राहिल्यास इतर तेलांच्या किमतींवर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्यांची अडचण होऊ शकते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकार पावले उचलू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.

सणांच्या काळात भाव वाढू नयेत, हे सरकारचे ध्येय आहे, त्यासाठी सरकार अनेक मार्गांनी काम करत आहे. आयात शुल्क कमी करण्यासोबतच सरकार बाजारात पुरेशा साठ्यावर लक्ष ठेवून आहे. गव्हाच्या आयातीवरील शुल्क कमी किंवा काढून टाकण्याबाबतही विचार सुरू आहे. खाद्यतेलात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.