श्रीकृष्ण संस्थेतर्फे दहीहंडी उत्सहात संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील खिर्डी खु. श्रीकृष्ण संस्थेतर्फे भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देवाला मंगल स्नान, धर्मध्वजाला मानवंदना,करून पालखीचे पूजन एपीआय गणेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.विविध नृत्य व वाजंत्री मंडळीच्या ढोल ताशा पथकाच्या गजरात भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची भव्य अशी पालखी गावातून मिरवणूक काढून विविध चौकामध्ये छोट्या छोट्या दहिहंड्या फोडण्यात आल्या.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी, पंचायत समिती मा. सदस्य दीपक पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद पाटील, निंभोरा पोलिस स्टेशन एपीआय गणेश धुमाळ, पीएसआय काशिनाथ कोळंबे, पोलिस पाटील प्रदीप पाटील, विलास पाटील, भागवत महाजन, मधुकर महाजन, मुरलीधर महाजन, रमेश खाचणे, विलास मिस्तरि, मुकेश नारखेडे, सुधाकर महाजन, प्रभाकर महाजन आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीकृष्ण मंदिर संस्थानचे गणपती आचार्य बाबाजी महानुभाव, कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप महाराज पंजाबी, यांची मंदिर परिसरात संध्याकाळी सार्वजनिक दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असता गोविंदा पथकांनी या मध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी गेवून जगदंबग्रुप खिर्डी बुद्रुक यांनी २०२२ या वर्षी सार्वजनिक दहीहंडी फोडण्याचा मान पटकवून त्यांना शाल श्रीफळ ११११ रू रोख आणि शालश्रीफड देवून त्यांचा श्रीकृष्ण संस्थेतर्फे गौरव करण्यात आला होता.