⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं, महाराष्ट्रातील या भागात कोसळणार पाऊस?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आलीय. दोन दिवसाआधी मान्सून रविवारी (१९ मे) अंदमानात दाखल झाला असून त्यानुसार यंदा वेळेपूर्वी मान्सून देशात दाखल होण्याची शक्यता आहे. ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये आज सोमवार आणि उद्या मंगळवारी तुफान पावसाचा इशारा दिला आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात देखील पाऊस होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे. सध्या जळगावात तापमान वाढीने कहर केला असून यामुळे जळगावकर हैराण झाले असून यात पावसाचा अंदाज असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील या भागात कोसळणार पाऊस?
आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा-विदर्भात पाऊस कोसळणार
याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांना देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.