⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरलेले तिघे निलंबित

वृक्षतोड थांबविण्यात अकार्यक्षम ठरलेले तिघे निलंबित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२२ । यावलच्या सातपुडा जंगलातील पश्चिम वनविभागाच्या वाघझिरा परिमंडळात गेल्या दोन महिन्यात मौल्यवान वृक्षतोड रोखण्यात अकार्यक्षम ठरलेल्याच्या कारणावरून वाघझिरा बीटचे वनपाल, वनरक्षक व एकावन मजुरास अशा तीन जणांना वनविभागाने निलंबित केले आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे.

वनपाल राजेश शिंदे, वनरक्षक डी वाय नलावडे वनमजूर काशिनाथ बेलदार अशा तिघांना तडकाफडकी निलंबनांची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती पश्चिम वनक्षेत्राची वनपरिक्षेत्रपाल एस.टी.भिलावे यांनी दिली आहे. यावलच्या सातपुडाजंगलातील वन विभागातील कार्यक्षेत्रात मागील काही महिन्यापासून सागवानी वृक्षासह इतर मौल्यवान वृक्षाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तसेच सागवानी लाकडाचा, अवैध व्यवसाय वन, विभागाच्या आशीर्वादाने जोमात सुरू असल्याची तालुक्यात चर्चा आहे. एकेकाळी घनदाट वनराईने असलेला सातपुडा सध्या बोडखा झालेला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह