धक्कादायक : यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीसोबत घडले..

ऑगस्ट 18, 2022 10:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलीला फूस लावून सुरत येथे पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर तेथे अत्याचार केल्याची बाब उघडकीस आलीय. याबाबत पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढवले आहे.

crime girl rep

काय आहे नेमकी घटना?
यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील अल्पवयीन मुलीला गावातीलच तरुण निलेश काशीनाथ कुंभार याने फुस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी अल्पयीन मुलगी यावल पोलिस ठाण्यात आल्यानंतर तिने तिच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. निलेश कुंभार याने गुजरात राज्यातील सुरत येथे नेत अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी यावल शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ सोडून पळ काढल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को व लैंगिक अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले.

अल्पवयीन तरुणीची जळगावात रवानगी
अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला बाल कल्याण समिती, जळगाव येथे पाठवण्यात आले. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी निलेश कुंभार याचा शोध पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now