जिल्हा हादरला : चोपड्यात ऑनर किलिंग, मुलाला मारली गोळी, मुलीचा दाबला गळा!

ऑगस्ट 13, 2022 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२२ । संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना चोपड्यात राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. चोपड्यात ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे.

chopda honor killing jpg webp

या संदर्भात अधिक असे की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजार झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे.

वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूर चोपडा) अशी मयत युगलाची नाव आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा.पोलीस अधीक्षक श्री. रावले हे करीत आहेत. देश दिवसेंदिवस प्रगतीचे नवीन शिखर घेत असताना आजही कुठेतरी आपण मागासलेले असल्याचे उदाहरण अनेकदा समोर येते. देशात अजूनही प्रेमविवाहाला मान्यता देण्यात पालकांची भूमिका विरोधाची असते. ऑनर किलिंगचे प्रकार कमी झाले असले तरी अद्याप थांबलेले नाही. काही वर्षापूर्वी धरणगाव आणि दोनगाव येथे देखील अशीच घटना घडली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now