वाणिज्य

Honda India Launches E- Vheical : भारतात हॉन्डा आणणार आपली पहिली इ – व्हेईकल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Honda India Launches E- Vheical। संपूर्ण भारतामध्ये पेट्रोल दरवाढ होत आहे. पेट्रोलच्या या वाढत्या भावामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातच इतर वस्तूंचेही भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे विज ही सर्वात स्वस्त असल्यामुळे नागरिक आपला कल इ व्हे-ईकलकडे (E- Vheical) वळवत आहेत. अशावेळी विविध कंपन्या भारतामध्ये आपल्या विविध इलेक्ट्रॉनिक व्हेईकलच्या कंपन्या आपली ई व्हेईकल मार्केटमध्ये आणत आहेत.

सध्या वाढत असलेले पेट्रोलचे भाव आणि याचबरोबर वाढत असलेले इतर खर्च यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. यामुळेच की काय? तर संपूर्ण भारतामध्ये इ-स्कूटर प्रचंड प्रमाणावर खरेदी केली जात आहे. यातच आता हॉन्डा या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर लॉन्च करण्याची तयारी दाखवली आहे. 2023 मध्ये हॉन्डा कंपनी आपली पहिली स्कूटर भारतात लॉन्च करण्याच्या तयारी मध्ये आहे.(Honda India)

होंडा कंपनीचे नाव संपूर्ण भारतामध्ये नावाजलेले आहे. यामुळे या कंपनीला नागरिकांची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे. हॉन्डा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया भारतामध्ये म्हणूनच आपली पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच करत आहे. हॉन्डा मोटरसायकल इंडिया ही कंपनी हॉन्डा मोटरसायकल जापान यांच्या सोबत भारतामध्ये काम करणार आहे. 2023 च्या सुरुवातीला हॉन्डा आपली पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल आणणार आहे. ही व्हेईकल लाँच होताच इतर सर्व कंपन्यांना एका टक्करचा प्रतिस्पर्धी मिळणार असल्यामुळे सगळ्यांची धगधग वाढली आहे.

ज्याप्रकारे संपूर्ण भारतामध्ये होंडा एक्टिवा हे नाव सर्वांच्या तोंडात बसले आहे. याच नावाचा उपयोग करत होंडा आपल्या अॅक्टिवाला इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये लोकांसमोर आणणार आहे. हॉन्डा एक्टिवा संपूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त विकली जाणारी वेहिकल आहे. भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारामध्ये ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेईकल चे प्रमाण वाढत आहे त्यातच आता हॉन्डा एक्टिवा सारखी दिसणारी हॉन्डाची इ- व्हेईकल आली तर नक्कीच इतर सर्व कंपन्यांच्या नाकी नऊ येणार आहेत. (Honda India Activa)

Related Articles

Back to top button