Raut vs Shinde : संजय राऊतांमुळेच मिळाले एकनाथ शिंदेंना मंत्रिपद – सुनील राऊत

ऑगस्ट 5, 2022 12:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भोंग्यामुळेच एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं असा दावा संजय राऊत यांच्या बंधू सुनील राऊत यांनी केला. भाजपतर्फे शिवसेनेविरोधात सूडाचं राजकारण केलं जातंय. लोक हजारो कोटी रुपये घेऊन फरार होतात, पण त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. आम्ही नियमानुसार व्यवहार केला असूनही काहीतरी कारण काढून संजय राऊतांना अडकवलं जात आहे. असे सुनील राऊत म्हणाले.

जे आज मंत्री झाले त्यांनी कारवाईला घाबरून आपले भोंगे बंद केलेत. परंतु संजय राऊत यांच्यामुळेच यापुर्वी हे मंत्रीपदावर आले होते. संजय राऊत यांचे वय 61 आहे. इतकेवर्ष त्यांनी काही काम केले नाही का? भाजप संजय राऊत यांच्या भोंग्याला घाबरून कारवाई करतंय. हे सूडाचं राजकारण सुरु आहे, हे स्पष्ट आहे. असे राऊत म्हणाले.

eknath shinde sanjay raut jpg webp

वर्षा राऊत यांनाही समन्स
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनादेखील सक्तवसुली संचलनालयाने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने त्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांना 112 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले होते, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे वर्षा राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now