दुर्दैवी : अमोद्यात अंगावर वीज कोसळल्याने शेतकरी ठार

ऑगस्ट 4, 2022 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२२ । यावल तालुक्यातील आमोदा येथील शेत शिवारात अंगावर वीज कोसळल्याने 60 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

shocking 1 jpg webp

ज्ञानदेव धनु चौधरी (वय ६०) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. तालुक्यातील आमोदा येथे चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. बुधवारी रोजी आपल्या आमोदा शिवारात शेतात पिकाची मशागत करीत असताना अचानक ढगांचा कडकडाट सुरू झाला व त्याचवेळी शेतकरी ज्ञानदेव चौधरी यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत शेतकरी जागीच ठार झाला.

हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने शेतमजुरांनी घटनास्थळी धाव घेतली व फैजपूर पोलिसांना माहिती दिली. फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मकसुद शेख, हवालदार उमेश सानप, गोकुळ तायडे, विकास सोनवणे यांनी पंचनामा केला. फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परीवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now