माळी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी हभप सुनिल महाजन

ऑगस्ट 3, 2022 11:05 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद येथील संत शिरोमणी सावता महाराज मंडळाची पंच वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात अध्यक्षपदी हभप सुनील बाबुलाल महाजन (शास्त्री महाराज ) यांची तर उपाध्यक्षपदी संदीप (आबा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

nashirabad 2

तसेच विष्णू पाटील, खजिनदार प्रविण विठ्ठल महाजन, सचिव पंढरीनाथ विठ्ठल पाटील, सहसचिव अशोक सुरेश माळी या पदाधिकारीची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. सभासद या पदांवर सोपान रामदास माळी, जगन्नाथ पांडुरंग पाटील, मधूकर बाबुराव महाजन, संतोष प्रभाकर पवार, भास्कर जिवराम पाटील, गणेश नामदेव पाटील, सुभाष यशवंत माळी, महेश एकनाथ माळी, योगेश नारायण माळी व तेजस नामदेव माळी यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पवन चौधरी, महेंद्र माळी, चेतन पाटील, चैतन्य माळी, निखिल पाटील, कृष्णा महाजन, सुमित माळी, राकेश पाटील व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now