मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला ट्रकने चिरडले!

जुलै 31, 2022 9:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । सावदा येथे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या सुमन तुकाराम काटे (वय ७० वर्ष) यांना दि.३१ रोजी सकाळी ६.३० वाजे दरम्यान अज्ञात ट्रकने धडक दिली. नायरा पेट्रोल पंपाच्या समोरच झालेल्या अपघातात सुमन काटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Kumbharkheda 1 jpg webp

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुमन तुकाराम काटे (कोष्टी) या गेल्या ४ ते ५ वर्षापासून मॉर्निंग वॉक करतात. सावदा – फैजपूर मार्गावर नायरा पेट्रोल पंपा समोर मॉर्निंग वॉक करून घरी परत येत असताना अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांना उजव्या पायास व हाताला तसेच पोटाला गंभीर दुःखापत झाली. सकाळी फिरत असलेले पादचारी इलियास खान अय्युब खान यांनी रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीस्वाराला थांबवून जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताली. शवविच्छेदनसाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून अंत्यसंस्कार भुसावळ येथे करण्यात आले .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सुमन काटे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now