मोबाईल चोरी करणाऱ्यास पकडून थेट पोलिसांत आणले!

जुलै 31, 2022 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२२ । सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रकरण वाढले असल्याने नागरिक देखील सतर्क झाल्याचे पाहायला मिळते आहे. यावलला एका चोरट्याने जबरीने मोबाईल हिचकावुन पळ काढला. मात्र, मोबाईल दाराकने देखील त्याचा पाठलाग केला आणि थेट पकडून पोलिसांत आणल्याचे समोर आला आहे. या घटनेने नक्कीच आता चोरट्यांमध्ये देखील भीती पसरेल असे सांगणे चुकीचे ठरवू नये.

jalgaon crime 2 jpg webp

तुषार तायडे (वय ३२, रा.भालशिव, यावल) यांनी येथील पोलिसांत फिर्याद दाखल केली. तायडे हे भुसावळ टी पॉईंट जवळील किनगाव-चोपडा रिक्षा स्टॉप जवळ असताना संशयित आरोपी चंद्रभान बाविस्कर रा. वढोदा यावल याने तायडे यांच्या खिश्यातुन जबरीने मोबाईल हिचकावुन पळ काढला. मात्र, तायडे यांनी देखील लागलीच पाठलाग केला. आणि सदर आरोपीला पकडून थेट पोलिसांत आणले. व याबाबत फिर्याद दिली.

त्यानुसार संशयित आरोपी चंद्रभान बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद गोसावी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now