अवैध वाळूची वाहतूक, चालकावर गुन्हा दाखल!

जुलै 29, 2022 5:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । अवैध वाळूची वाहतूक करणारे डंपर एमआयडीसी पोलीसांनी पकडले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 1 3 jpg webp

शहरातील तांबापूरा भागात एमआयडीसी पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना शिरसोलीकडून जळगावात येणाऱ्या रस्त्यावर आज शुक्रवार पहाटे ३.३० वाजता अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे (एमएच १९ बीव्ही ७११७) क्रमांमाचे डंपर एमआयडीसी पोलीसांनी शहा अवलीया मस्जीद जवळ पकडले. वाळू वाहतूक करण्याबाबत परवाना विचारला असता डंपर चालक कमलेश रमेश देवरे (वय २८) रा. श्रीराम नगर, दादावाडी, जळगाव याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीसांनी डंपर ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अशपाक महेमुद शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालक कमलेश देवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now