⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी : कोरोनाने पती हिरावला, उपासमारीमुळे आईने मुलांना विक्रीला काढले!

दुर्दैवी : कोरोनाने पती हिरावला, उपासमारीमुळे आईने मुलांना विक्रीला काढले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । कोरोनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले तथा उघड्यावर आले. अमळनेर शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या पतीचा देखील कोरोनात मृत्यू झाला. तिला सात मुलं असल्याने त्यांचा सांभाळ करणे तिला कठीण जात होते. यामुळे तिने चक्क पोटाच्या मुलांना विक्रीला काढले. दरम्यान, पोलिसांनी त्या पोटाच्या मुलांना विक्री करणाऱ्या आईला ताब्यात घेतले आहे.

हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) असे त्या महिलेचे नाव आहे. या अमळनेर शहरात गांधलीपुरा भागातील सुभाष चौकात त्यांच्या पोटाच्या मुलानां विक्री करत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपासासाठी पो. कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील यांचे पथक रवाना झाले आणि सदर महिलेचा शोध घेत तिला गाठले. माहिती घेवून तिचे जवळील ७ मुलांसह पोलीस स्टेशनला हजर केले. यावेळी स्वतः हिराबाई देवा गायकवाड (वय ४०, रा. बेघर फिरस्ते) व सोबत ३ मुली, ४ मुले यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

सदर महिलेच्या ताब्यातील मुलांबाबत अधिक विचारपुस करुन चौकशी केली असता सदर मुले व मुली त्या महिलेचे अपत्य असून तिचे पती कोरोना काळात कोविड आजाराने मयत झाले. यामुळेच तिच्‍याकडे स्‍वतःचे व मुलांच्‍या उपजिविकेसाठी पुरेसे साधन नसल्याने ती मुलांना इच्छुक लोकांना विक्री करत होती. बेकायदेशीरपणे मुलांना विकणे चुकीचे असून महिलेला समज देण्यात आली.

भविष्यात मुलांना विकुन टाकण्याची शक्यता असल्याने तिच्‍या ताब्यातील ३ मुली व ४ मुले व तिच्‍या पालन पोषणकरीता सदर बालकांची काळजी घेण्यासाठी व त्या बालकांना संरक्षण मिळणेकरीता त्यांना बालकल्याण समिती जळगाव येथे हजर करून महिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. सदरची कारवाईवेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोउपनि नरसिंग वाघ, पो.कॉ. नाजिमा पिंजारी, दिपक माळी, रविंद्र पाटील उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह