शिंदे सरकार : वीज दर प्रति युनिट एक रुपयांनी स्वस्त, मोठा दिलासा

जुलै 27, 2022 7:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. वेळी शिंदेंनी ८ महत्वाचे निर्णय घेतले ज्यात हा एक महत्वाचा निर्णय आहे.

ते म्हणाले आहेत की, ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. पैठणमध्ये उपसा सचिन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे जवळपास 40 गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच मराठवाड्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्र आहेत्याला 100 कोटी निधी मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

eknath shinde and devendra fadanvis

पोलिसांसाठी घरे
मुंबई, मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागातील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील. यासाठी तत्काळ आणि दीर्घ टप्प्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या घरांची परिस्थिती बदलून टाकण्याचा आमचा निर्धार आहे. आपले पोलीस, वारा, पाऊस, सण – उत्सव आणि कोविड सारख्या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यासाठी उभे असतात. त्यांना घरे उपलब्ध व्हावीत यासाठी विविध पर्याय आणि योजनांचा विचार करा. म्हाडा, सिडको, एसआरए, क्लस्टर योजना यांसह सर्वसमावेशक घरकुल योजना, परवडणारी घरे तसेच एमएमआरडीए आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावीत यासाठी आराखडा तयार करा. पोलिसाकरिता घरे बांधताना ती अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सामुग्रीचा वापर करण्यात यावा.

गुन्हे मागे
गणपती उत्सव आणि दहीहंडी उत्सवांमधील कार्यकर्त्यांवर छोट्या-मोठे अगदी शुल्क कारणामुळे केसेस झालेल्या आहेत. त्या केसेस देखील मागे घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे आणि कोरोना काळामध्ये देखील अनेक लोकांवर त्याच्या विद्यार्थी आहेत. तरुण आहेत सुशिक्षण बेरोजगार आहेत असे अनेक लोकांवर ज्या केसेस झाल्यात त्या देखील मागे घेण्याचा तपासून निर्णय घेतलेला आहे.

मुद्रांक शुल्क निश्चित
ग्रामीण भूमी घरकुल जी योजना आहे त्यामध्ये देखील मुद्रांक शुल्क जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी रेडी रेकनर प्रमाणे घेतलं जात होतं. ते पूर्णपणे 1000 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ते जे मोजणी शुल्क जे आहे त्याच्यामध्ये देखील 50% सवलत दिलेली आहे. ही जी काही योजना होती दोन मजल्याच्या ऐवजी चार मजल्याचा निर्णय घेतलाय. परंतु त्या ठिकाणच्या जो काही आपला शेतकरी असेल किंबहुना त्याला घर मिळणार आहे त्या त्याच्यामध्ये ग्रामीण भूमीहीन जो आमचा माणूस आहे. त्याला त्याच्या कन्सेंटनी हा निर्णय आपण लागू करणार आहोत.

उपसा जलसिंचन योजनेला निधी
पैठणमध्ये ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना आहे. आमदार संदीपान भुमरे त्याचा सातत्याने पाठपुरावा करत होते. 890 कोटी रुपयांची ही योजना आहे. ती त्याला मान्यता दिलेली आहे. जवळपास 60 गाव आहेत. गावांना याचा फायदा होणार आहे. त्यासाठी 1550 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हळळ केंद्राला शंभर कोटी
मराठवाड्यामध्ये जे बाळासाहेब ठाकरे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर आणि आमदार तानाजी मुटकुळे यांनी मागणी केली होती. त्या हळद संशोधन केंद्राला शंभर कोटी देण्यात आले आहेत.

मेडिकल कॉलेजच्या जागा वाढवणार
राज्यातल्या 15 मेडिकल कॉलेजमध्ये 50 जागा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रत्येकी 24 कोटी रुपये शासनाचे जे काही हिस्सा आहे तो देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनावर एकूण 360 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now