पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा दिलासा! जाणून घ्या आज तुमच्या शहरातील दर

जुलै 27, 2022 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) दरात कोणताही बदल केलेला नाही. यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (२७ जुलै) पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज जाहीर झालेल्या दरानुसार जळगावमध्ये आज पेट्रोलची किंमत १०७. ६० रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९४.०३ प्रति लिटर इतकी आहे. Petrol Diesel Rate Today

petrol diesel 2

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या खाली आला आहे. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे.तर महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलवर प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांचा दिलासा दिला होता.

महाराष्ट्रातील दर?
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये एवढा आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.

देशातील इतर बड्या शहरातील दर
पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ८४.१० रुपये आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर
दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
नोएडामध्ये पेट्रोल ९६.५७ रुपये आणि डिझेल ८९.९६ रुपये प्रति लिटर
लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये आणि डिझेल ९३.७२ रुपये प्रति लिटर
तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर
गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर
हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now