Share Market : शेअर बाजारात हाहाकार ; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण

जुलै 26, 2022 4:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । भारतीय शेअर बाजारात (Share Market) गेल्या काही सत्रात वाढ नोंदविली गेली होती, मात्र आज या वाढीला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, शेअर बाजार आज सकाळी हिरव्या चिन्हावर उघडला आणि दिवसभराच्या व्यवहारानंतर लाल चिन्हावर बंद झाला. आजच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 497.73 अंकांनी म्हणजेच 0.89% घसरून 55,268.49 वर बंद झाला, तर निफ्टी 163.20 अंकांनी म्हणजेच 0.98% घसरून 16,467.80 वर बंद झाला.

share market jpg webp

सकाळी बाजाराची स्थिती कशी होती?
मंगळवारी सकाळी जागतिक बाजारातून मिळालेल्या संमिश्र संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात किंचित वाढ झाली. व्यवहाराच्या सुरूवातीला सेन्सेक्स ३०-पॉइंट आणि निफ्टी ५०-पॉइंट हिरव्या चिन्हांसह उघडले. सुरुवातीला, सेन्सेक्स 68.16 अंकांच्या वाढीसह 55,834 वर उघडला. त्याच वेळी, निफ्टी 16,632.90 अंकांवर किंचित वाढीसह उघडला. मात्र, शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्यात घसरण पाहायला मिळाली. सकाळी 9.30 च्या सुमारास सेन्सेक्स 270 अंकांनी तर निफ्टी 86 अंकांनी घसरला.

एलआयसी शेअर स्थिती
२६ जुलै रोजी एलआयसीच्या शेअरमध्ये पुन्हा घसरण झाली आहे. आज LIC चे शेअर्स 8.45 अंकांच्या म्हणजेच 1.24% च्या घसरणीसह 675.50 वर व्यवहार करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now