⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | स्वराज्य महोत्सव उत्साहात साजरा होणार : बैठकीत निर्णय

स्वराज्य महोत्सव उत्साहात साजरा होणार : बैठकीत निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । शासनाच्या निर्देशानुसार ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. यावेळी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी तिरंगा चौकात सामूहिक राष्ट्रगीत म्हणण्याचा इतिहास घडवण्याचा निर्णय घेण्यात आला.


अमळनेर तालुका हा क्रांतिकारक ,समाजसेवक ,आंदोलकांचा तालुका आहे. या तालुक्याला इतिहास आहे. शासनाने ९ रोजी सकाळी ११ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत सादर करण्याच्या सूचना असंल्या तरी संपूर्ण अमळनेर शहर राष्ट्रगीत म्हणणार असल्याची योजना तयार करण्यात आली. तिरंगा चौकात मोठ्या ध्वजाखाली पोलीस ,होमगार्ड , एनसीसी ,स्काऊट ,एन एस एस विद्यार्थी ,इतर विद्यार्थी तसेच सामान्य नागरिक याना देखील समाविष्ट करून राष्ट्रगीत म्हणण्यात येणार आहे. याच सोबत नगरपालिकांच्या १८ प्रभागातील घंटा गाड्यांवरील स्पीकर मधून , शहरातील शाळांमधून स्पीकर वरून एकाचवेळी ११ वाजता राष्ट्रगीत सादर करण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी देखील राष्ट्रगीत व राष्ट्राचा सन्मान करत राष्ट्रगीताचे वेळी स्तब्ध उभे राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन , वृक्षारोपण करणे ,विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम ,चित्रकला ,निबंध , वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करणे , स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा लोगो लावणे , घरोघरी तिरंगा फडकवणे ,सडा रांगोळी टाकणे , वारसा स्थळे जतन करणे स्वच्छता मोहीम राबवणे ,तालुक्याचे ,खेड्यांचे इतिहासाला उजाळा देणे ,स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य , माहिती सामान्य लोकांपर्यँत पोहचविणे, ग्रामीण भागात महिला मेळावे ,बचत गट ,मोबाईल दुष्परिणाम ,ओनलाईन फसवणूक याबाबत जनजागृती करणे ,शेतकरी मेळावे घेणे ,शेतकऱ्यांना मार्गदर्शन, किशोरी मेळावे ,प्रभात फेरी ,देशभक्तीपर चित्रपट दाखवणे ,तसे कार्यक्रम घेणे , अर्थसाक्षरता शिबीर , घेणे याबाबत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून ३० पर्यंत कार्यक्रमाच्या वेळापत्रकाचे नियोजन सादर करा अशा सूचना तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दिल्यात .


बैठकीस तहसीलदार मिलिंद वाघ ,नायब तहसीलदार नवनाथ लांडगे ,गटविकास अधिकारी विशाल शिंदे ,तालुका कृषी अधिकारी भारत वारे ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , सहा गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हेमंत महाजन , प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य पी आर शिरोडे ,तालुका क्रीडा संघटनेचे सुनील वाघ ,मुख्याध्यापक सुनील पाटील ,मुख्याध्यापक संजीव पाटील ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील ,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष आर जे पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी हजर होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह