नगरसेविका पूत्रास मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात गुन्हा

जुलै 25, 2022 2:41 PM

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । सहलीचे फोटो मोबाईलवर व्हायरल करण्यावरून मुक्ताईनगरात महिलांनी भर चौकात खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास महिलेसह तिच्या मुलीने व शिवसेनेचे छोटू भोई यांच्यासह अनेकांनी चोप दिला होता. या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून आंदोलन केले होते. या प्रकरणी संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 12T162526.461 jpg webp

नगरसेविका पूत्र तथा कंत्राटदार अमीनखान अहमदखान (४२, मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार, एका तरुणीचे फोटो त्यांनी सोशल मिडीयात टाकल्याच्या कारणावरून संशयीत आरोपी छोटू भोई, आकाश भोई, अमोल भोई, अनिकेत भोई, बंडू काळे, रुपाली प्रभाकर पाटील, नेहा प्रभाकर पाटील (सर्व रा.मुक्ताईनगर) यांनी शुक्रवारी दुपारी दिड वाजता प्रवर्तन चौक ते राज टायरकडे जाणार्‍या रस्त्यावर रस्ता अडवून चापटा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण केली. तपास पोलिस उपनिरीक्षक परवीन तडवी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now