भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

जुलै 24, 2022 8:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झाले आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

chandrkant patil jpg webp

कष्टाला कमी पडू नकोस, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही, अशी शिकवण चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी कायम दिली. पाटील त्यांनीही त्यांनी शिकवण अंगीकारली. कठीण परिस्थितीत संघर्ष करायला शिकवणारी मायमाऊली गेल्याने दादांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे.


घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असताना दादांच्या मातोश्री सरस्वती पाटील यांनी अतिशय संघर्षात दिवस काढले. बच्चू पाटील कापड गिरणीत कामाला असताना, पैसे अतिशय कमी मिळत असताना त्यांनी संसाराचा गाडा हाकला. चंद्रकांत पाटील यांना शिक्षण दिलं, संघर्षाची प्रेरणा दिली. माझ्या आयुष्यात, प्रवासात माझ्या आईचा सर्वाधिक वाटा राहिलाय, अशी भावना चंद्रकांत पाटील नेहमी बोलून दाखवायचे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now