हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात भव्य मूक मोर्चा

जुलै 24, 2022 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । देशरात अनेक ठिकाणी हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी याबाबत सर्व समाज बांधवांना जागृत करण्यासाठी आज शहरात टॉवर चौक ते जिल्हाअधिकारी कार्यालया पर्यंत हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या,विरोधात भव्य मूक मोर्चा हिंदू समाजातर्फे काढण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे मंत्री योगेश्वर गर्गे हे होते.

jalgaon 20 jpg webp

देशरात अनेक ठिकाणी हिंदूवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हा देश नक्की संविधानाच्या आधारे चालत आहे की, शरीयाच्या आधारे हे कळत नाही. हा सर्व प्रकार थांबला पाहीजे, अशा मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जिल्हाघिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले. विश्व हिंदू परिषदेचे संबोधन योगेश्व गर्गे यांनी मोर्चाचे आयोजन केले.

मोर्चा मध्ये सर्व हिदुत्ववादी संघटना विश्व हिंदु परीषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ , सार्वजनिक गणेश महामंडळ , हिंदु महासभा, हिंदु जागरण मंच , हिंदु राष्ट्रसेना, शिवप्रतिष्टान हिंदुस्थान , सनातन संस्था, MIDC तील उद्योजक , व्यापारी संघटना , विविध आध्यात्मिक क्षेत्रांतील महंत , शहरातील विविध समाजाचे प्रतिनिधी व प्रतिष्ठित व्यक्ती तसेच प्रत्येक घटकाचा सहभाग होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now