⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मुक्ताई : ‘सुर्यकन्या’ पार करणाऱ्या एका दिंडीची व्यथा!

मुक्ताई : ‘सुर्यकन्या’ पार करणाऱ्या एका दिंडीची व्यथा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । कामिका एकादशीनिमित्त मुक्ताई दर्शनासाठी शेकडो दिंड्या लाखो भाविक मुक्ताईनगरमध्ये दाखल होत असतात. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा वारकरी मोठ्या उत्साहाने जपत आहे. मुक्ताईनगरातील कोथळी येथील आदीशक्ती श्रीसंत मुक्ताबाई कोट्यावधी भक्ताचे श्रद्धास्थान आहे. मुक्ताई दर्शनासाठी अनेक श्रद्धाळु वारकरी दिंडीच्या माध्यमातून पायी चालत जिवन सार्थकी लावतात.

अनेक वर्षाची अखंड परंपरा असलेली कांडवेल, रावेर तालुक्यातील कोळदा व सुलवाडी गावांची हरिनाम दिंडी वारा, पाऊस.. तापीला असलेल्या पुराची पर्वा न करता मुक्ताईच्या भेटीसाठी जिवाची पर्वा न करता ऐन पावसाळ्यात पुराच्या पाण्यातुन हरीनामाचा गजर व मुक्ताईचा जयघोष, खडतर प्रवास करीत ‘सुर्यकन्या तापी’ नदी १५ ते २० होळींच्या साहाय्याने ओलांडून शेमळदे येथे दाखल होत असते.

कामिका एकादशीनिमित्त दरवर्षी हि दिंडी ऊन,वारा,पाऊस तसेच तापीला आलेल्या पुराची कोणतीही तमा न बागळता अखंडपणे परंपरा ठेवत आहे. शेमळदे गावा मध्ये सुधाकर पंढरीनाथ पाटील , कैलास पांडुरंग पाटील, राजेंद्र साहेबराव पाटील, ऍड. पवनराजे पाटील यांच्याकडे दिंडीच्या फराळाची व्यवस्था असते. दिलीप पाटील, योगेश पाटील, पवन पाटील, व्ही.एस.पाटील, किशोर भोई, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, दीपक पाटील, सोपान कोळी, विनोद धोबी, संदीप जंजाळ, प्रफुल्ल पाटील, नारायण पाटील, अभय ताठे यांच्या सह अनेक माऊली भक्त दरवर्षी मेहनत घेत असतात.

हरिनामाचा गजर करत दिंडी उचंदे खामखेडा मार्गे मुक्ताईनगरीत दाखल होत असते. मात्र, दिंडी पार करीत असलेल्या दिंडी मार्गातील अडथळ्यांबाबत शासनाचे पुर्णत: दुर्लक्ष असून वजनदार मंत्रीपदे लाभलेल्या जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यातील वारकऱ्यांचे प्रश्न सोडवतील का? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरीत आहे. केळी उत्पादक शेतकरी लोकांचा हा भाग असून तापी नदीवर मेंढोळदे-सुलवाडी पुल झाला तर बहुतांश समस्या सुटण्यासारख्या आहे.

लोकप्रतिनिधींनी या भागात असलेल्या समस्येकडे लक्ष घालुन सर्वांनी मिळून सुर्यकन्या तापी नदिवरील सुलवाडी – मेंढोळदे पुलाचा मार्ग त्वरित मार्गी लावण्याची गरज आहे. कारण आज पण तापी नदीचे पाणी मोठ्या वेगाने वाहत असतांना सुद्धा नाईलाजास्तव असा खडतर प्रवास कशाचीही तमा न बागळया हरीनामाच्या गजरात वारकऱ्यांना करावा लागत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह