जळगाव जिल्हाराजकारण

मला ड्रग माफिया दाखवून तुरुंगात टाकण्याचा डाव होता : आ.महाजन यांचा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२२ । महाविकास आघाडी सरकारमध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह २८ जणांविरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी राज्यातील पोलिसांकडून काढून घेत आता सीबीआय (CBI) दिली आहे. शिंदे-भाजप सरकारच्या या निर्णयानंतर गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे. मला तर ‘ड्रग माफिया’ दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता, असा दावा गिरीश महाजन यांनी केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

आपल्या वाहनात ड्रग टाकायचा, ते पकडायचा आणि आपल्याला ड्रग माफिया म्हणून घोषित करून तुरूंगात टाकायचे, असे एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाला लाजवेल, असे षडयंत्र आपल्याविरुद्ध करण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याचा तपास चौकशी आता ‘सीबीआय’कडे दिली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसून येईल.

माझ्या विरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता.

याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले. यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता. मात्र तो सर्व रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला. हे प्रकरण चौकशीसाठी ‘सीबीआय’कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती.

मात्र महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, आता आमचे सरकार आले आहे, आम्ही ही सर्व चौकशी ‘सीबीआय’कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button