मनोरंजनसृष्टी पुन्हा हादरली ; ‘भाबीजी घर पर है’ मधील तरुण अभिनेत्याचं निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘भाबीजी घर पर है'(Bhabiji Ghar Par Hai) मधील अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) यांचं निधन झालं आहे. या तरुण अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा हादरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश हे क्रिकेट खेळत असताना ते अचानक जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Deepesh Bhan passed away
‘भाभीजी घरपर है’ ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. मलखानला या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेत त्याने वैभव माथूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. वैभव आणि दीपेश यांची जोडी ‘टीका-मलखान’ म्हणून लोकप्रिय होती. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दीपेश गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंज सृष्टीत कार्यरत होता. त्याने अनेक मालिकांमध्ये सहाय्यक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर दीपेशने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतसुद्धा काम केलं आहे. मात्र त्याला खरी ओळख ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेने मिळवून दिली आहे. या अभिनेत्याच्या निधनावर अजूनही चाहत्यांना विश्वास ठेवणं कठीण होत आहे.
खूप संघर्ष करावा लागला
एका मुलाखतीत बोलताना दीपेश भान म्हणाला की, मुंबईत मला खूप संघर्ष करावा लागला. अनेकदा लोक मला म्हणायचे की मुंबईत आल्यावर ४-५ ऑडिशन्स दिल्यावर तुला चित्रपट मिळू लागतील. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. लोकांना वस्तुस्थिती ६ महिन्यातच कळते. बरेच लोक हिंमत गमावतात पण मी माझे धैर्य कधीच तुटू दिले नाही.