खडसे समर्थकाला मुक्ताईनगरात भर चौकात महिलांनी दिला चोप

जुलै 22, 2022 4:49 PM

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे । सहलीला गेलेल्या मुलीच्या फोटोला वेगळा संदर्भ देऊन सोशल मीडियावर व्हायरल करत बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी महिलांनी भर चौकात खडसे समर्थक नगरसेविका पुत्राला चोप दिला. हा प्रकार घडत असताना मुक्ताईनगरच्या मुख्य चौकात एकच गर्दी झाली होती. आम्ही तुम्हाला निवडून देतो तर आमची काम करण्या ऐवजी तुमची मुल अशी रिकामी काम का करतात ? असा संतप्त सवाल चोप देणाऱ्या महिलांनी विचारला. नगरसेविका पुत्राचे नाव अबिद खान असे त्या महिलांनी सांगितले.

chop jpg webp

मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर वायरल केल्याचा संतापातून महिलेने नगरसेविका पुत्रास चोप दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये घडली आहे. आज मुक्ताईनगर येथे नगराध्यक्ष पदाची निवड होती, मात्र न्यायालयाच्या निर्देशांवरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातच खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास ही मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलीची आई खूप संतापली होती. यावेळी त्यांनी सरळ सरळ त्या मुलाला मी अजून मारिन असेही म्हटले. याच बरोबर खडसे समर्थक नागरसेविकेचा मुलगा असल्याने याला लाज वाटली पाहिजे असे त्या म्हणाल्या. विकसित तंत्रज्ञानामुळे जागोजागी व्हिडियो व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच काही बहाद्दर नेहेमीच याचा फायदा घेतात आणि समोरच्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार मुक्ताईनगर येथे घडला आहे. मुलीचा व्हिडियो व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/415720247250423

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now