जळकी मील खून प्रकरण : दोन तासात शहर पोलिसांनी तिघांना पकडले!

जुलै 20, 2022 7:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील ते रेल्वे ट्रॅक दरम्यान असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. जवळच रक्त आणि काही दगड पडलेले असल्याने तरुणाचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत होता. शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) असे मयताचे नाव आहे. मयताच्या धारदार सुऱ्याने खून करण्यात आला आहे.

murder 1 jpg webp

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणारा रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा हा हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होता. बुधवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह जळकी मीलजवळ असलेल्या गटारीत मिळून आला. रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या गटारीत रमाचा मृतदेह उलटा पडलेला होता तर जवळच रक्त आणि काही दगड पडलेले होते.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड हे घटनास्थळी पथकासह पोहचले. घटनास्थळी मयताच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, रहीम शहा याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून दुपारी त्याला तीन तरुणसोबत घेऊन गेले होते अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच संशयितांची माहिती काढून खान्देश सेंट्रल परिसरातून तिघांना ताब्यात घेतले आहे. विलास, पवन अशी संशयितांची नावे आहेत. वारंवार शिवीगाळ करीत असल्याने आणि आर्थिक विषयामुळे खून केल्याची माहिती तिघांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना संशयितांची गुप्त माहिती मिळाली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now