अल्पवयीन मुलीला पळून नेत तीन दिवस अत्याचार, आरोपीला अटक

जुलै 17, 2022 3:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर तीन दिवस अत्याचार केल्याची धक्कदायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.

crime 2022 06 06T110556.610 jpg webp

जीवन सुधाकर पाटील (वय २१) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जीवन सुधाकर पाटील (वय २१) याने अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना तीला फूस लावून दुचाकीवर पळून नेत शेतातील झोपडीत ठेवून सतत तीन दिवस तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार समजल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी जीवन पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now