आज ट्रेनने प्रवास करण्याआधी ‘ही’ बातमी वाचा ; अन्यथा होईल गैरसोय

जुलै 17, 2022 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । जर तुम्ही आज ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने आज 200 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही रद्द झालेल्या ट्रेनची यादी एकदा तपासून पहा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. रेल्वेकडून दररोज सकाळीच रद्द झालेल्या गाड्यांची यादी जारी केली जाते. आजही अनेक गाड्या रद्द, वळवल्या आणि वेळापत्रक बदलण्यात आले.

train 1

वाहतूक अडथळा
देशात सध्या मान्सून सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी अनेकवेळा खराब हवामानामुळे रेल्वे वाहतुकीत अडचणी निर्माण होतात, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.

त्यामुळे ट्रेन रद्द
अशा स्थितीत आजही अनेक गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. आज 17 जुलै रोजी रेल्वेने 246 गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी 203 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून 43 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय आज ७ गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, तर ६ गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

असे तपासा
आज देशात कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत याची माहिती https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/ या लिंकवरून मिळू शकते. याशिवाय, आज कोणत्या गाड्या वळवण्यात आल्या आहेत किंवा त्याचे वेळापत्रक बदलले आहे, या माहितीसाठी https://www.irctchelp.in/train-rescheduled-diverted-today-updates/ या लिंकवर क्लिक करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now