भुसावळात शिक्षकाचे घर फोडले, सोन्याचे दागिने लंपास

जुलै 15, 2022 2:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२२ । भुसावळ शहरात चक्क चोरट्यांनीं शिक्षकाच्या घरात डाव साधल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी सोन्याचे दागिने असा एकूण ६० हजार ९०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime krushi center

राजेंद्र अशोक कोल्हे (वय ४६) यांनी पोलिसांत तक्रार दिली. हे भुसावळ शहरातील गोपाळ नगरात आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे, ते शिक्षक असून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि सोन्याचे तार असा ऐकून ६० हजार ९०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला सायंकाळी ६ वाजता राजेंद्र कोल्हे घरी आले असता त्यांना हा प्रकार उघडकीला आला. तातडीने त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now