गुलाबराव पाटील वाघ आता ते मोकळे झाले आहेत ! : खा. उन्मेष पाटील
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । गुलाबराव पाटील नावाचा वाघ आता सुटला असून जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीसाठी गुलाबराव पाटील अधिक प्रयत्न करतील याचा मला विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार उमेश पाटील म्हणाले की, गुलाबराव पाटील यांच्यावर कशाप्रकारे दबाव टाकत त्यांना काम करू दिलं जात नव्हतं हे त्यांनी स्वतः सांगितलं आहे. गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेत राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत असल्यामुळे त्यांची गळचेपी होत होती. आता या गळचेपी मधून ते बाहेर निघाले असून भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत. यामुळे आता खऱ्या अर्थाने जळगाव जिल्ह्याचा वाघ पिंजऱ्या बाहेर निघाला आहे.
आमदार गुलाबराव पाटील व खासदार उन्मेश पाटील यांच्या दोघांमधील वैर आता अख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे. हे दोघे नेहमीच एकमेकांवर टीका साधत असतात. मात्र आम्ही एकमेकांवर करत असलेल्या टिका या जनतेच्या सेवेसाठी होत्या. आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हत्या. असे यावेळी पाटील म्हणाले.