जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । अमळनेर नगरपालिका निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे. त्यामुळे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटाकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. काल येथील माजी आमदारच्या कार्यालयात त्यांनी माजी नगरसेवकासह, इच्छुक आणि नवीन उमेदवारांशी संवाद साधला. दरम्यान, यासाठी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबई येथे रवाना झाले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना जास्तीचा वेळ न देता मतदान प्रणालीचे वेळापत्रक जाहीर केल्याने उमेदवारांसह प्रशासनाची खूपच धावपळ उडाली आहे. परंतु, माजी आमदार यांनी शहरात विविध विकास कामांना प्राधान्य दिले होते. त्याचप्रमाणे आताही जनता ही पाठीशी उभी राहील आणि माझ्या गटांकडून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना नक्की विजयी करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच इच्छुक उमेदवार हे प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधत आहे. त्यातून आपला प्रभाग निश्चित करताना दिसत आहेत. उमेदवारांची संख्या ही जास्त होत असल्याने यातूनही मार्ग काढू असाही विश्वास त्यांनी आपल्या बैठकीच्या मार्गदर्शनातून व्यक्त केला.