⁠ 
रविवार, मे 19, 2024

चाळीसगाव शहरातील रस्ते, पूल व उद्यानांच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपये निधी आणणार – आमदार मंगेश चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२२ प्रभाग क्रमांक 3 सह शहरवासीयांना त्रासदायक ठरत असणाऱ्या हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. तसेच चाळीसगाव शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे काळी माती वर आल्याने अनेक प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली होती. नुकताच राज्यात सत्ता बदल झाल्याने शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी प्रयत्न सुरु केले असून पहिल्या टप्प्यात लवकरच ५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार आहे मात्र सातत्याने चाळीसगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची तात्पुरती का होईना तातडीने दुरुस्ती आवश्यक होती. यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून स्वखर्चाने दयानंद ते खरजई नाका रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांची मुरूम व खडी टाकून दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह भर पावसात सदर रस्त्याची पाहणी केली व कामाचा स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ केला.


चाळीसगाव शहरात जेव्हा जेव्हा समस्या अथवा संकट आले तेव्हा तेव्हा आमदार मंगेश चव्हाण हे संकटात धावून आले असल्याचे पाहायला मिळाले आहे. मग ते कोरोना असो, महापूर असो व शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी असो आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन जनतेला दिलासा दिला आहे. मागील वर्षी देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने स्टेशन रोड, गणेश रोड, करगाव रोड ची स्वखर्चाने दुरुस्ती केली होती. तसेच पावसाळा संपल्यानंतर आमदार निधी व नगरपालिका निधीतून रस्त्यांचे डांबरीकरण देखील केले होते. लवकरच चाळीसगाव शहरातील रस्ते, पूल व उद्यानांच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपये निधी मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


सदर शुभारंभ प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राजेंद्र अण्णा चौधरी, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील,  नगरसेवक नितीन पाटील, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, सदानंद चौधरी, रणजीत पाटील, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, अभय वाघ, देवा गांगुर्डे, मनोज गोसावी, बंडू पगार, अग्गा सैय्यद, अकलाक खाटिक, धीरज पवार, मयूर घोरपडे, विकी देशमुख, विपुल पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.