नांद्रात वाहनाचा धक्का लागल्याने 48 वर्षीय प्रौढाचा मृत्यू

जुलै 12, 2022 1:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । चारचाकी गाडी मागे घेताना 48 वर्षीय प्रौढाला धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घडली. या प्रकणी वाहन चालकाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 5 jpg webp

रमेश परदेशी (48, रा. नांद्रा, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे. पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे मारुती (इको क्र. एम.एच.19 सी. झेड. 6247) ही चारचाकी गाडी चालक आनंदा हिरामण भोई (रा.बांबरुड, महादेवाचे) हे मागे घेत असतांना मागील बाजूस काही अंतरावर रमेश परदेशी (48, रा.नांद्रा ता.पाचोरा) यांना वाहनाचा जोरदार धक्का लागल्याने परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक आनंदा भोई याच्याविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now