कुंझरात शेती वाटणीवरून एकाचे डोकं फोडले!

जुलै 12, 2022 11:08 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । भाऊ बंदकीचे शेती हिस्से वाटणीवरून कुंझरात एकाची लाठ्या काठ्यांनी मारहाण करून डोकं फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत चाळीसगावच्या मेहुणबारे पोलिसांत चोघांविरुद्द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime chalisgaon 1 jpg webp

अनिल विजयगीर गोसावी (वय ४१ रा. कुंझर ता. चाळीसगाव, जळगाव) यांनी मेहुणबारे पोलिसांत फिर्याद दिली. अनिल गोसावी हे त्यांच्या शेतात कचरा उचलत होते. त्यावेळी आरोपी सदगीर भोलू गोसावी, पिंटू सदगीर गोसावी, कमलबाई सदगीर गोसावी, किरण भिकन गोसावी सर्व रा. कुंझर ता. चाळीसगाव, जळगाव यांनी संगनमत करून फिर्याद यान लाठ्या काठ्यांनी मारहाण करून डोकं फोडले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अनिल गोसावी यांनी मेहुणबारे पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सदगीर भोलू गोसावी, पिंटू सदगीर गोसावी, कमलबाई सदगीर गोसावी, किरण भिकन गोसावी सर्व रा. कुंझर ता. चाळीसगाव, जळगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना प्रतापसिंग मथुरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now