Signature Astrology : तुमची सही करण्याची पद्धत ठरवत असते तुमच भाग्य, वाचा काय लिहिलं आहे तुमच्या भाग्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । प्रत्येक माणसाच्या आयुष्यात स्वतः करत असलेली सही खूप महत्त्वाची असते. कित्येक जण हे सही गांभीर्याने घेतात तर कित्येकांना आपण कशी सही करतोय याचा फरकही पडत नाही. मात्र सहीचे काही प्रकार असतात. ज्यामुळे सही करणाऱ्या माणसाचं व्यक्तिमत्व हे समोरच्या माणसाला समजू शकत. उदाहरणार्थ कित्येक नागरिकांना आपली सही नक्की कशी आहे हे माहीत नसतं ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सही करतात याचा अर्थ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात सिरीयस नाही किंबहुना हि व्यक्ती आपल्या आयुष्याला गांभीर्याने घेत नाही. (Signature Astrology)
एखाद्या व्यक्तीची स्वाक्षरी म्हणजेच सही केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल नाही तर संपूर्ण आयुष्याबद्दल सांगते. ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात किती आनंदी किंबहुना समृद्ध आहे हे देखील त्याची सही सांगते. म्हणून प्रत्येकाला नागरिकांनी स्वतःच्या सहीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. कारण की आपण करत असलेली सही ही आपलं व्यक्तिमत्त्व ठरत असते.
ज्या व्यक्ती सहीच्या खाली दोन रेषा ओढतात याचा अर्थ त्या व्यक्ती आपापल्या आयुष्यात आर्थिक दृष्ट्या स्वयंभू असतात. मात्र तितकेच कंजूस म्हणजे इतरांसाठी पैसे खर्च न करणारे असतात. या लोकांची प्रकृती सामान्य असली तरी त्यांना नेहमीच असुरक्षित वाटत असतं. यामुळे ते कोणावरही विश्वास ठेवत नाहीत. काही लोक त्यांच्या सही खाली एकच रेष काढतात. आणि त्यामागे एक किंवा दोन ठिपके लावतात अशा लोकांना पैसे मिळवण्यात अधिक अडचणी सामोरं जावं लागतं. मात्र ते बचत प्रचंड करतात असे म्हटले जाते. जर कोणी व्यक्ती आपल्या सहीमध्ये पहिले अक्षर लिहून त्याच्या तळाशी एक बिंदू लावतात. अशी व्यक्ती श्रीमंत असते. शिवाय ती आर्थिकदृष्ट्या मजबूतही असते त्यांचं वैवाहिक जीवनही आनंदी असतं.
जर कोणी व्यक्ती सरळ आणि सोप्या पद्धतीने सही करत असेल तर अशी व्यक्ती आरोग्य दायी असते. त्यांचा आरोग्य चांगलं असतं. त्यांना पैसे उभारण्यासाठी कधीही समस्या येत नाहीत. या लोकांना आरोग्य चांगलं असल्याने स्वतःच्या आरोग्याचीच काळजी नसते. सही करताना जे लोक पहिला अक्षर मोठा करतात किंवा पहिला मोठा आणि इतर लहान काढतात अशा व्यक्तींना हळूहळू आयुष्यात उच्च स्थान म्हणजेच प्रगती मिळते. त्यांची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतात. असं म्हटलं जातं आणि समजा कोणती व्यक्ती पेन वर दबाव टाकत स्वतःची सही करत असेल तर ही व्यक्ती अधिकाधिक पैसे कमवायचा भाग पाडते. हे लोक जास्त तणावाखाली असतात.