जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही श्री मंगळग्रह मंदिर ते वाडी संस्थानापर्यंत ‘मंगल दिंडी’ काढण्यात आली.
दिंडीत सजविलेल्या पालखीत श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा होती. दिंडी मंदिरापासून चोपडा नाका, फरशी पूल,पान खिडकीच्या मागील रस्त्यावरून वाडी संस्थानात पोहोचली. तेथे संस्थानातर्फे सेवेकरी संजय ठेकेदार यांनी दिंडीचे स्वागत करून मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांना मानाचे श्रीफळ दिले. दिंडीत संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम ,विश्वस्त अनिल अहिरराव, डी .ए. सोनवणे ,व्ही. व्ही. कुलकर्णी आदींसह सर्व सेवेकरी उपस्थित होते. या सवाद्य दिंडीत सहभागी सेवेकऱ्यांसह दिंडी मार्गातील अनेक भाविकांनी कोसळत्या पाऊसाला अंगावर घेत खास वारकरी पद्धतीच्या नृत्याचा मनमुराद आनंद घेतला. ठिकठिकाणी माता-भगिनींनी दिंडीचे पूजन केले.