शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ तरुणाला तिघांनी लुटले

जुलै 9, 2022 4:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ एका ४३ वर्षीय व्यक्तीला अंदाजे २० ते २२ वर्षाच्या तीन अज्ञात भामट्याने दुचाकी थांबवून व डोळ्यात मिरची टाकून हजारोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहारत पोलिसांत दोन अज्ञात भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CRIME 31 jpg webp

योगेश परमानंद सोनी (वय ४३) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. सोनी यांची शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीच्या गेटसमोर तीन अज्ञात भामट्यानी दुचाकी थांबवली व एकाने फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकले. दरम्यान, २२ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला. याप्रकरणी सोनी यांनी पोलिसातफिर्याद दिली त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संदीप परदेशी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now