रेल्वे स्टेशनकडून अट्टल दुचाकी चोरटा जेरबंद, डझनभर दुचाकी जप्त

जुलै 8, 2022 10:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । चाळीसगावसह नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव या ठिकाणी दुचाकी चोरणारा अट्टल चोरट्याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून वेगळ्यावेगळ्या कंपनीच्या १२ दुचाकी असा एकूण २ लाख २२ हजारांच्या किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आणखी गुन्हे उघडीस येण्याची शक्यता आहे.

crime baik

विकास उर्फ विक्की शिवाजी महाले असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे, विकास हा चाळीसगाव शहर‎ पोलिस ठाण्यात पाहिजे असलेल्या‎ आरोपींच्या यादीतला संशयित‎ आहे. तो गुरुवारी जळगावात‎ आल्याची माहिती स्थानिक गुन्हे‎ शाखेचे निरीक्षक किरणकुमार‎ बकाले यांनी मिळाली. त्यानुसार‎ ‎विजयसिंग पाटील, अनिल‎ देशमुख, सुधाकर अंभोरे, राहुल‎ पाटील, किरण चौधरी, प्रितम‎ पाटील, प्रमोद लाडवंतारी, इश्वर‎ पाटील व प्रमोद ठाकूर यांच्या‎ पथकाने त्याला ताब्यात घेतले.‎ ‎पोलिसी खाक्या दाखवताच त्याने‎ १२ दुचाकी चोरल्याची कबुली‎ दिली. या सर्व दुचाकी पोलिसांनी‎ हस्तगत केल्या आहेत. पुढील‎ तपासासाठी विकासला चाळीसगाव‎ शहर पोलिसांकडे सोपवले.‎

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now