चाळीसगावात शेतातून बैलगाडी नेण्यावरून तरुणासह कुटुंबियांला मारहाण

जुलै 7, 2022 10:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या कुटुंबियांना सहा जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime chalisgaon 1 jpg webp

ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळ (वय २३) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. हा तरुण चाळीसगाव शहरातील खडकी बायपास येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो चालक असून शेतीदेखील करतो. दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर घरी असताना त्याच भागातील रहिवाशी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे सर्व रा. खडकी बायपास यांनी शेतातून बैलगाडी का घेवून गेला या कारणावरून ज्ञानेश्वर मांडोळे याला बेदम मारहाण केली. यासह ज्ञानेश्वरचे काका भिमराव मांडोळे, काकू मिनाबाई मांडोळे, वडील मुरलीधर मांडोळे, आई छायाबाई मांडोळे, काका सतिश मांडोळे, काकू अरूणाबाई मांडोळे, भाऊ सचिन यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी ज्ञानेश्वर मांडोळे याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे सर्व रा. खडकी बायपास चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now