⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | संतापजनक : धमकी देत अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार करीत केले व्हिडीओ शूटिंग, दुसऱ्यानेही गिरवला तोच कित्ता!

संतापजनक : धमकी देत अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार करीत केले व्हिडीओ शूटिंग, दुसऱ्यानेही गिरवला तोच कित्ता!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । धमकी देत अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार करीत व्हिडीओ शूटिंग केले, दुसऱ्यानेही तोच कित्ता गिरावत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांना सदर घटना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडीस आला आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीसह वडिलांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांत दोन संशयित आरोपीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर शहरात वास्तव्याला असणार्‍या आणि घरकाम करणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस तालुक्यातील तोरनाळा येथील संशयित आरोपी आकाश सुरेश मुरळकर याने दि. २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने दि. १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

सदर तरूणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरूणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चारही जणांच्या विरूध्द भाग ५, गुरनं २९९/२०२२ भादंवि कलम ३७६ (२) (जे) (एन); ५०६; ३४ सह पोक्सो कायद्याचे कलम ५ आणि ६ तसेच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ (१) (आर); ३ (१) (एस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह