जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । रोटरी क्लब अमळनेरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदभार दि. १ जुलै रोजी रोटरी हॉल येथे संपन्न झाला. यात नूतन अध्यक्षपदी किर्तीकुमार कोठारी तर सचिवपदी ताहा बुकवाला यांची निवड करण्यात आली आहे. या सभेत रोटरी क्लब अमळनेरची वर्षासाठी २१ जणांची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली, रोटरी जिल्हा (डिस्ट्रिक ३०३० नाशिक ते नागपूर) कार्यकारणीत अमळनेर रोटरी क्लबच्या ६ सदस्यांची निवड झाली.
मावळते अध्यक्ष वृषभ पारख व सचिव प्रतीक जैन येथील रोटरी क्लब अमळनेरच्या विविध प्रोजेक्टची वर्षभरातील माहिती दिली. मागील वर्षीच्या कामकाजाचा आढावा तसेच नवीन पदाधिकारी निवड बैठकीत यावेळी अध्यक्ष वृषभ पारख म्हणाले, रोटरी या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समाज विधायक कामे करत आली. परिपूर्ण अमळनेरचे आश्वासक पाऊल पुढे पडते आहे. पक्ष व राजकारण विरहित ही संघटना असल्यानेच विविध क्षेत्रातील नागरिक यात सहभागी होत आहेत. सर्व रोटरी सदस्यांचे आभार मानले,
यावेळी अजय केले यांनी नवीन पदाधिकाऱ्यां शुभेच्छा दिल्या. प्रतीक जैन यांनी आभार मानले. नवनिर्वाचित अध्यक्ष किर्तीकुमार कोठारी यांनी येणाऱ्या वर्षात शैक्षणिक मेळावा, शेतकरी मेळावा, वृक्षारोपण, वैदकीय शिबिरे, योग दिवस, गरजू वैक्तीना कपडे वाटप, एड्स प्रोटीन किट, सवलतीमध्ये कॅटरॅक्ट, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, बाल व माता संगोपन सहाय्य प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवले जातील, असे सांगितले.