धक्कादायक : २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग

जुलै 5, 2022 1:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंद नगर पोलिसांत एकाविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

crime girl rep

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक कॉलनीत २२ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. २८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास याच परिसरात राहणारा शैलेंद्र वासूदेव पाटील हा तरूणी एकटी घरात असताना घराच्या मागच्या दरवाजातून येवून तिचा हात पकडला. तु मला मारायला मुले का पाठविली असे म्हणून तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर नंतर पिडीत तरूणीने कुटुंबियांना सांगितले.

दरम्यान, पिडीत तरूणीसह कुटुंबियांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी शैलेंद्र वासूदेव पाटील रा. स्टेट बँक कॉलनी याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now