⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | चिमणी वीटभट्टी बंद करा, अन्यथा..

चिमणी वीटभट्टी बंद करा, अन्यथा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील चिमणे विटभट्टी बंद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे तहसीलदार श्वेता संचेती यांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान ही मागणी पूर्ण न झाल्यास न्यायालयीन कारवाई करणार असल्याचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.

तालुक्यात असणाऱ्या चिमणी विटभट्टयांत वापरण्यात येणाऱ्या विषारी केमीकलमुळे संबंधित परीसरातील शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. परीसरात दुर्गंधी पसरली असुन शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना खुप त्रास होत आहे. विटभट्टयांत वापरण्यात येणाऱ्या विषारी केमीकल मानवी आरोग्यास हानीकारक असून शेती पिकांवर विपरीत परीणाम होतांना दिसून येत आहे. दि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी अधिकृत चिमणी विटभट्टे बाबत मागितलेल्या माहीतीबाबत प्रशासनाने दिलेल्या माहीतीत कोणतेही परवाना नसल्याचे मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई यांना लेखी कळविले होते. त्यानुसार असे निर्दशनास येते कि, सदर चिमणी विटभटटे व्यवसाय हा अनधिकृत असुन त्यांचेकडे कोणत्याही परवानगी नाही. तरीही हा व्यवसाय प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चालू आहे.
तरी अवैधपणे चालु असणा़ऱ्या या व्यवसायाला आपल्या अधिकारात बंद करण्यात यावे अन्यथा मनसे न्यायालयीन प्रक्रिया करणार असल्याचे अध्यक्ष मधुकर भोई यांनी तहसीलदार श्वेता संचेती यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान तहसीलदार श्वेता संचेती यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र नायब तहसीलदार निकेतन वाळे यांनी याबाबत बोलतांना सांगितले की, संबंधित चिमणी विटभट्टृयांवर चौकशी करण्याचे आदेश तलाठी यांना दिले आहेत. याबाबत आक्षेपार्ह आढळुन आल्यास संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.प्रसंगी निवेदनावर उपाध्यक्ष श्रीराम भोई,मं गेश कोळी, दिनेश बावस्कर, अतुल कोळी, प्रमोद जावळे यांच्या सह्या आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह