धक्कादायक : १० लाखांच्या बैल जोडीसह गुरे, ढोरेही चोरले

जुलै 2, 2022 4:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । चोरटा कुठे डल्ला मारेल याचा नेम नाही. चोपडा तालुक्यातील विष्णापूर येथे १० लाख किमतीच्या बैल जोडी व भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे गुरे ढोरे चोरून नेल्याची घटना उघडीस आली आहे. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 07 02T165621.353 jpg webp

मधुकर सीताराम पाटील (वय ६२) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यांच्या १० लाख किमतीच्या बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना दि. २८ रोजी उघडीस आला. याबाबत पाटील यांनी दि. १ रोजी अडावद पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जगदीश कोलंबे करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत गणेश तुका सुधीर पुंधिलके ढाके (वय ५८ रा. वराडसिम ता.भुसावळ ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यांचे ४१ हजार किमतीचे गुरे ढोरे कुणी तरी अज्ञात भामट्याने चोरून नेले. तसेच गोपीनाथ पुन्हा धनगर व विकास संतोष पाटील यांचे देखील गुरे ढोरे चोरी झाले. याबाबत ढाके यांनी भुसावळ तालुका पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास गणेश गव्हाळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now