जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अनेक वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे. त्यातील पात्र कलाकारांनी लोकांच्या मनात घर करून ठेवलं आहेत. या मालिकेत जेठालालच्या दुकानात काम करणाऱ्या नट्टू काकांची भूमिका अभिनेता घनश्याम नायक यांनी साकारली होती. मात्र घनश्याम नायक यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतर या मालिकेत आजपर्यंत एकही नवा अभिनेता दिसला नाही. पण आता या मालिकेत नवीन नट्टू काकांची एन्ट्री होणार आहेत. Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी एक व्हिडिओ रिलीज करून प्रेक्षकांना नवीन नट्टू काकांची ओळख करून दिली आहे. असित कुमार मोदी यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘जुन्या नट्टू काकांनी हा नवीन नट्टू काकांना पाठवला आहे. ज्याप्रमाणे तुम्ही त्यांना तुमचे प्रेम द्यायचे, त्याचप्रमाणे नवीन नट्टू काकांनाही भरभरून प्रेम द्या. मात्र, असित कुमार मोदी यांनी नवीन नट्टू काकांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव उघड केलेले नाही.
नवीन नट्टू काकांची ही एन्ट्री तुम्ही पण बघा.
ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून टीव्हीवर प्रसारित होत आहे. अलीकडेच या शोमधून अनेक वर्षांनी अंजली मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता आणि सोढी बनलेले गुरुचरण सिंग यांनी निरोप घेतला होता. त्याच वेळी, शोच्या मुख्य पात्रांपैकी एक, तारक मेहता म्हणजेच कवी शैलेश लोढा देखील काही काळ शोमध्ये अभिनय करताना दिसत नाही. शैलेश लवकरच टीव्हीवर कॉमेडी कवी शो होस्ट करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे.