कृषी केंद्राचे गोडावून फोडले, २ लाखांच्या रोकडसह १ लाखाचे रसायन चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । चोरटा कुठे डल्ला मारेल याचा नेम नाही, शेंदुर्णी येथील कृषी केंद्राचे गोडावून फोडून तब्ब्ल २ लाखांच्या रोकडसह १ लाखाचे रसायन लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पहूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

crime krushi center

संजय रामकृष्ण पाटील (वय ५३) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. शेंदुर्णी ता. जामनेर येथील बस स्टॅन्ड च्या रोडवरील पाटील कृषी केंद्राच्या पाठीमागील गोडावून मधील संडासची खिडकी एका बाजूने काढून अज्ञात चोरटयांनी आता प्रवेश केला. दरम्यान, यात तब्बल २ लाखांच्या रोकडसह १ लाखाचे रसायन चोरून नेले. ही घटना २९ रोजी ३ वाजेच्या उघडीस आली.

याबाबत संजय रामकृष्ण पाटील (वय ५३) यांनी पोलिसांत फिर्यादी दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी भेट दिली. त्यानुसार भा.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेस्कॉ शशिकांत पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now